
लॉकडाऊन आणखी वाढवण्याचे मोदी यांचे संकेत
लॉकडाऊन आणखी वाढवण्याचे मोदी यांचे संकेत
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेत त्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले, मात्र तिसऱ्या लॉकडाऊनमधल्या निर्बंधांची चौथ्यामध्ये गरज नसेल, असं त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील लॉकडाऊनची रणनीती शुक्रवारपर्यंत द्या, असं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. माझं ठाम मत आहे, की पहिल्या लॉकडाऊनमधल्या सर्वच निर्बंधांची दुसर्या टप्प्यात जशी आवश्यकता नव्हती, तशीच तिसऱ्या टप्प्यात केलेल्या निर्बंधांनी चौथ्या टप्प्यात गरज नसेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
रेल्वे सुरु करण्याची गरज बोलून दाखवली जात होती, मात्र सर्वच मार्गांवर रेल्वे सुरु न करता फक्त काही गाड्याच चालवल्या जातील, असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईतील लोकल सुरु करा, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे केली. दरम्यान, अर्थव्यवस्थेच्या रोडमॅपसंदर्भात सर्व राज्यांनी दिलेल्या सूचनांवर योग्य विचार सुरु आहे, असं आश्वासन मोदींनी दिलं. ग्रामीण भागात होणारा कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.