मोदी सरकारचे दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष ऐतिहासिक निर्णय व कोरोना नियंत्रणात आहे. – खा.डॉ.हिना गावीत

Featured नंदुरबार
Share This:

मोदी सरकारचे दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष ऐतिहासिक निर्णय व कोरोना नियंत्रणात आहे. – खा.डॉ.हिना गावीत

 नंदुरबार (वैभव करवंदकर ): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घटने मधिल कलम 370 रद्द केला. तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेली एक ऐतिहासिक चूक सुधारली. ०६ अॉगस्ट २०१९ ह्या दिवशी खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. तसेच कोरोना विषाणू विरुध्द वेळेवर लॉकडाऊन लागू करुन इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाची स्थिती खूपच नियंत्रणात आहे. खा.डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.  यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित उपस्थित होते. खा. गावीत म्हणाल्या की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्ष नुकतेच ३० मे २०२० रोजी पूर्ण झाले. या काळात मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. खूप वर्षापासून संघर्ष चालू असलेल्या कलम ३७० रद्द करुन. जम्मू-काश्मीरला तसेच लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश ३१ अॉक्टोबर २०१९ रोजी अस्तित्वात आले. तसेच राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. मुस्लीम महिलांची तिहेरी तलाकच्या बंधनातून सुटका केली. धार्मिक अल्पसंख्यांक निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी कायद्यात सुधारणा केली. असे असंख्य ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत.  कोरोनाचा महामारीत इतर देशांच्या तुलनेत भारतातील बाधितांची संख्या नियंत्रणात आहे. भारतातील कोरोनामुळे रुग्ण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशाने ” जनता कर्फ्यू ” चे पालन केले. त्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये ” जान है तो जहान है । ” असे बोलून २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन केले. कोरोनाचे संकट आल्यानंतर त्याचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांना एकूण १५००० कोटी रुपये आरोग्यविषयक खर्चासाठी दिले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *