कोरोना विषाणू शोधण्यासाठी मोबाईल टीम सुरू करणार – डॉ.राजेंद्र भारुड

Featured नंदुरबार
Share This:

कोरोना विषाणू शोधण्यासाठी मोबाईल टीम सुरू करणार – डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (वैभव करवंदकर ): नंदुरबार जिल्ह्यातील कोविड 19 विषाणूचा संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत मोबाईल टिमच्या माध्यमातून कोरोना विषाणूची बाधा झालेली रुग्ण शोधण्यात मदत होणार आहे. या मोबाईल टिमच्या माध्यमातून कोरोना ची साखळी देखिल खंडित करु शकतो. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता नागरिकांनी स्वॅब देण्यासाठी पुढे यावे. यासाठी प्रशासनाकडून दोन मोबाईल स्वॅब पथक नंदुरबार शहरासाठी तयार करण्यात येणार आहे. तालुका निहाय देखील स्वॅब घेण्याचे पथक तयार करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . नंदुरबार जिल्ह्यातील चार शहरांमधील आठ दिवसांच्या संचारबंदीचा उद्या गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने सदरच्या संचारबंदीत काही शिथिलता देऊन सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 31 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत असे तीन दिवस सकाळी 07 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत व्यवहार व दुकाने सुरू ठेवण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी राहणार आहे. परंतु त्यासाठी नियमांचे पालन व अटी लागू असतील. नंदुरबार शहादा तळोदा व नवापूर या चार शहरांमध्ये सकाळी 07 ते सायंकाळी 07 या वेळेत मागील काळात दिलेल्या आदेशाप्रमाणे मुभा दिलेली दुकाने सुरू राहतील. तर प्रत्येक रविवारी लागू केलेली कडक संचारबंदी कायम असेल. तसेच अक्कलकुवा धडगाव तालुक्यात सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *