२३ऑगस्ट रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे चोपडा येथे भ्रमणध्वनी वापसी आंदोलन

Featured जळगाव
Share This:

२३ऑगस्ट रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे चोपडा येथे भ्रमणध्वनी वापसी आंदोलन

चोपडा (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्र सरकारने पाच-सहा वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी भ्रमणध्वनी दिलेले आहेत त्यांची वारंटी गॅरेंटी संपलेली आहे. ते वारंवार बंद पडतात हंग होतात. डाऊनलोड होत नाही तसेच रेंज प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि नादुरुस्त झाले तर शासकीय खर्च दोन हजार रुपये वरच लागतो, दुरुस्ती खर्च सरसकट प्रत्येक नादुरुस्त भ्रमणध्वनी झालेल्या सेविकेस मिळत नाही. त्यामुळे घरचा खर्च करावा लागतो. आणि हा त्रास कमी की काय ?महाराष्ट्र सरकारने पोषण आहार ट्रॅकर ॲप इंग्रजीत दिले आहेत ते बऱ्याच अल्पशिक्षित सेवीकांना भरणे जमत नाही..त्यामुळे फजिती होत आहे मानसिक तणावाखाली नोकरी करावी लागत आहे. म्हणून ते मराठीत असावी यासाठी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने गेल्या ३महिन्यापासून बहिष्कार टाकला आहे त्यानुसार
. जळगाव जिल्ह्यातही भ्रमणध्वनीवर काम बंद केले आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने 17/ 8/ 2021पासून जुने गॅरंटी /वॉरंटी संपलेली भ्रमणध्वनी वापसी आंदोलन सुरू केले आहे. वर्धा भंडारा गोंदिया परभणी जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी परतही केलेले आहेत . त्या आंदोलनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातही दिनांक 23/ 8/ 2019 रोजी चोपडा येथील प्रकल्प 1 व प्रकल्प 2 कार्यालयांवर सेविकांचे भ्रमणध्वनी परत करण्याचे आंदोलन दुपारी १२ वाजता ते २ वाजता होनार आहे दिनांक २५ ऑगस्ट रोजी धरणगाव प्रकल्प कार्यालयावर ही त्याच वेळेस आंदोलन होईल तरी या तालुक्यातील सेविका नी वेळेवर यावे असे आवाहन अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अमृत महाजन तालुका अध्यक्ष वत्सला पाटील ममता महाजन प्रेमलता पाटील आदींनी केले आहे .. त्यासंबंधी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ,शासनाने नवीन भ्रमणध्वनी उपलब्ध करून द्यावेत तोवर अंगणवाडी सेविका रजिस्टरवर कामाची नोंद करतील. तसेच पोषण आहार इंग्रजी मध्ये न करता मराठीत उपलब्ध करून द्यावा ही देशील मागणी आंदोलनात नमूद करण्यात आली आहे असे पत्रकात म्हटले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *