कोविंड सेंटरला आमदार स्मिताताई वाघ यांची भेट व रुग्णांची विचारपूस 

Featured जळगाव
Share This:
अमळनेर ( प्रतिनिधी ) –  शहरातील कोविड सेंटरमधील रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळी थेट या सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची असतेवाईकपणे विचारपूस केली .कोरोना आजाराचे मनात दहशत असल्याने कोणीही पुढारी वा अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहचत नव्हते. आमदार स्मिता वाघ तेथे पोहचल्याने रुग्णांनीही मोठ्या अपेक्षेने त्यांना पाहून आपल्या मनातील भाव आणि अस समस्या व्यक्त केल्या . त्यानंतर त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सुविधा रुग्णांना पुरविण्याच्या सूचना दिल्या .
अमळनेर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . शंभरावर रुग्ण संख्या पोहोचली असून कोरंटाइनची संख्या मोठी आहे . त्यांना शहरातील कोविड सेंटर मध्ये दाखल करून उपचार सुरू आहेत . या सेंटरमध्ये रुग्णांना कोणत्याही पायाभुत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आमदार स्मिता वाघ याना प्राप्त झाल्या होत्या . त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना नसते कागदी घोडे नाचवने बंद करून उपाययोजना करण्याचे सांगितले होते . तरीही त्यांच्याकडे तक्रारी येत राहिल्याने अखेर सोमवारी सायंकाळी त्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ, डॉ प्रकाश ताडे,डॉ संदीप जोशी,भाजपा सरचिटणीस राकेश पाटील,राहुल चौधरी यांच्या सोबत कोविड सेंटरला भेट दिली . यावेळी त्यांनी रुग्णांची असतेवाईक पणे चौकशी केली , प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या .कोरोना सारख्या या जीवघेण्या संसर्गाला न घाबरता जनतेसाठी निस्वार्थ धडपड करणाऱ्या स्मिता वाघ यांच्या सारख्या पुढाऱ्यांची नक्किच गरज आहे.
पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांचे समुपदेशन करून दिला कोरोनाशी लढण्याचा विश्वास आमदार स्मिताताई यांनी पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांची नुसती विचारपूस न करता समुपदेशनही केले . वैद्यकीय व प्रशासनातील अधिकारी ही ज्या कोविड सेंटरला जाण्यास धजत नाहीत अशा ठिकाणी , आमदार स्मिताताई वाघ अचानक पोहचल्याने , रुग्णांनी त्यांचे कौतुक करत अशा या जिगरबाज लोकप्रतिनिधीला त्यांनी सलाम केला आहे .
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *