मंत्री गुलाबराव पाटील,मा.आमदार प्रा.सोनवणे यांची कोरोनावर मार करण्यासाठी श्रीविठ्ठलाकडे प्रार्थना

Featured जळगाव
Share This:

मंत्री गुलाबराव पाटील,मा.आमदार प्रा.सोनवणे यांची कोरोनावर मार करण्यासाठी श्रीविठ्ठलाकडे प्रार्थना

यावल ( सुरेश पाटील): राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील तसेच चोपडा विधानसभा माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी कोरोनावर मात करून जनसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी यावल तालुक्यातील विरावली येथील श्री विठ्ठल मंदिरात यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सपत्नीसह श्रीविठ्ठलाकडे प्रार्थना केली.
यावल तालुक्यातील विरावली येथील श्रीविठ्ठल मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोनावर आधारित सर्व नियमांचे पालन करून मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये नामदार गुलाबराव पाटील, माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे हे लवकर कोरानावर मात करूण सुखरूप जनतेच्या सेवेत पूर्वरत रूजू व्हावे या करता श्रीविठठल चरणी आज दि.24मार्च रोजी प्रार्थना करण्यात आली विरावली गावचे माजी सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक तुषार उर्फ मुन्ना सांडुसिंग पाटील आणि त्यांच्या सौ.गजश्री तुषार पाटील यांनी प्रार्थना केली यावेळी विरावली काही ग्रामस्थ सोशल डिस्टन्स व तोंडावर मुख्यपट्टी लावून हजर होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *