
नंदुरबार जिल्ह्याचे वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होणार – खा.डॉ. हिना गावित
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू होण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या हालचाली सुरुझाल्या आहेत. अशी माहिती खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी आमदार डॉक्टर विजय कुमार गावित देखील उपस्थित होते. ? खासदार गावित म्हणाल्या की , नंदुरबार जिल्हातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली असून लवकरच टोकर तलाव रस्त्यावरील 16.61 हेक्टर जागेवर नवीन अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारणी कामास प्रारंभ होणार आहे. देशातील 13 राज्यासह महाराष्ट्रातील एकमेव नंदुरबार जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाल्याचे देखील खा. डॉ. हिना गावित यांनी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले की , नंदुरबार जिल्हा रुग्णालयाशी संलग्न आरोग्य विभागाला गेल्यावर्षी 22 मार्च 2019 रोजी याबाबतची मान्यता मिळाली होती. त्यानुसार आता लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामास प्रारंभ होणार आहे. यासाठी 325 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यात 60 टक्के सहभाग केंद्र आणि 40 टक्के सहभाग राज्याचा असणार आहे. त्यानुसार केंद्र शासनातर्फे 195 कोटी रुपये तसेच राज्य शासनाकडून 130 कोटी रुपये सहभाग असणार आहे. नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर आरोग्य मंत्री असताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी वेळोवेळी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. खासदार झाल्यानंतर डॉ. हिना गावित यांनी देखील नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न लावून धरला. त्यानुसार केंद्र शासनाने मंजुरी दिली. शहरालगत असलेल्या टोकरतलाव शिवारात प्रशस्त जागेवर नवीन वैद्यकीय महाविद्यालय केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर लवकरच इमारत बांधकामास सुरुवात होणार आहे . खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले. देशाच्या तुलनेत आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर ओरिसा, पंजाब, राजस्थान राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे.