
घरी जाणार्या परप्रांतीय श्रमिकांना जळगाव रेल्वे स्टेशन वरून जेवणाची व्यवस्था
रेडक्रॉस आणि ओसवाल सुख शांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या कम्युनिटी किचन तर्फे रेल्वेने घरी जाणार्या परप्रांतीय श्रमिकांना जळगाव रेल्वे स्टेशन वरून जेवणाची व्यवस्था
जळगाव- रेडक्रॉस आणि ओसवाल सुख शांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या कम्युनिटी किचन तर्फे सूरत, झारखंड आणि विशाखापट्टणम येथे रेल्वेने प्रवास जाणार्या परप्रांतीय श्रमिकांना जळगाव रेल्वे स्टेशन वरून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यात लहान मुले, महिला व अनेक श्रमिक होते. यावेळी 1000 हून अधिक फूड पाकीट वितरण करण्यात आले.
रेडक्रॉसच्या स्वयंसेवकांनी स्वतः सर्व मजूर बांधवांना फूट पॅकेट दिले आणि “आपने घर के खाने जैसा स्वादिष्ट खाना दिया है..” अशा शब्दांत त्यांनी रेडक्रॉसचे आभार व्यक्त केले. यावेळी जैन इरीगेशन यांच्या वतीने 550 फूड पॅकेट, सिंधी बांधवांच्या वतीने 700 फूड पॅकेट आणि श्री अनिल पगारीया यांच्या वतीने सर्वांनी पिण्याच्या पाण्याची जारची व्यवस्था करण्यात आली.
जे लोक निराधार, निराश्रित व गरजू आहेत, त्यांना दोन वेळचे पौष्टीक व पोषणयुक्त जेवण देण्यासाठी इंडियन रेडक्राँस सोसायटी आणि ओसवाल सुख शांती संघाच्या सहकार्याने कम्युनिटी किचनचा उपक्रम सुरू केलेला आहे. कोविड – १९ अंतर्गत कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दिनांक – ११ एप्रिल, २०२० पासून दररोज सकाळ संध्याकाळ 3500 जेवणाचे पाकीटांचे वाटप शहरातील गोर गरीब मजूरांना जे बाहेरील प्रांतातील आहेत त्यांना देत आहेत तसेच ज्यांना क्वारंटाईन मध्ये ठेवलेल्या सर्व लोकांना सकाळचा चहा बिस्कीट, नाश्ता, फळ दुपारचे व संध्याकाळचे जेवण देत आहोत. हे कार्य रेडक्राँस आणि ओसवाल सुख शांती संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा दिली जात आहे.
जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार व नेतृत्वाखाली उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, सहसचीव राजेश यावलकर , आपत्ती व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुभाष सांखला, प्रशिक्षक घन:शाम महाजन, अनिल कांकरीया व अन्य पदाधिकारी व जनसंपर्क अधिकारी सौ. उज्ज्वला वर्मा ह्या उपक्रमाचे अत्यंत शिस्त बध्दपणाने नियंत्रण करीत आहेत. कोणीही गरजू अन्नावाचून भुकेला राहणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली जाते आहे.
❣️विशेष❣️
जळगाव जिल्ह्यातील सर्व कोरोना व काॅरंटाईन नागरिकांना फळ देण्याची जबाबदारी रेडक्रॉसने स्विकारली आहे.