अट्रावल येथील मुंजोबा यात्रेत कोरोना नियमाचे सर्रास उल्लंघन- महसूल,पोलीस,आरोग्य यंत्रणेसह भाविक बेफिकीर

Featured जळगाव
Share This:

अट्रावल येथील मुंजोबा यात्रेत कोरोना नियमाचे सर्रास उल्लंघन.

महसूल,पोलीस,आरोग्य यंत्रणेसह भाविक बेफिकीर.

जिल्हाधिकारी यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधून.

यावल (सुरेश पाटील) : कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण खान्देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अट्रावल ता.यावल जिल्हा जळगांव येथील मुंजोबा यात्रा रद्द अशी प्रसिद्धी 8 दिवस आधी शासनाकडून व संबंधितांकडून करण्यात आली होती आणि आहे. तरी सुद्धा मुंजोबा यात्रेत म्हणजे शनिवार दि.13, सोमवार दि,15 व शनिवार दि.20 फेब्रुवारी 2021 रोजी अट्रावल येथे मुंजोबा दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी करून यात्रेचे स्वरूप आणले.यावल तालुका महसूल,पोलिस,आरोग्य विभाग यंत्रणेसह उपस्थित भाविकांनी आंधळ्याची भूमिका निभावून कोरोनाचे सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन करून कोरोना विषाणू व शासन आदेशाची पायमल्ली केली यात जिल्हाधिकारी जळगाव संबंधित जबाबदार सर्व यंत्रणेवर काय कारवाई करतील? याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.
अट्रावलची मुंजोबा यात्रा माघ महिना सुरू झाल्यानंतर शनिवार आणि सोमवार(पौर्णिमा अखेर)भरत असते.अट्रवलचा मुंजोबा संपूर्ण खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे दरवर्षी शनिवार आणि सोमवार या दिवशी मोठी गर्दी होऊन यात्रा भरत असते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून अट्रावल येथील मुंजोबा यात्रा रद्द करण्यात आली होती.तरी सुद्धा भाविकांनी कोरोना नियमाचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून तोंडावर मास्क न लावता,सोशल डिस्टन्स न पाळता गर्दी केली.यात्रेत यावल फैजपूर पोलिसांचा बंदोबस्त होता किंवा नाही?कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी कैलास कडलग यांचे कार्यक्षेत्रातील तहसीलदार,पोलिस, आरोग्य विभाग स्थानिक ग्रामपंचायत ग्रामसेवक व मुंजोबा देवस्थान ट्रस्टने एवढा मोठा बेफिकीरपणा का दाखविला? संबंधित सर्वांना कोरोना विषाणूचा आणि कोरणा नियमांचा धाक नव्हता का? या सर्व बाबीकडे जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी आपले लक्ष केंद्रित करून सोमवार दि.22 व शनिवार दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी अट्रावल मुंजोबा देवस्थान देवस्थानावर भेट देऊन जमावबंदीचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही? याची प्रत्यक्ष खात्री करून संबंधित यंत्रणेवर कडक कारवाई करावी अशी मागणी जळगाव जिल्ह्यातून होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *