न.प . कर्मचाऱ्यांना श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चेरिटेबल तर्फे मास्क व हातमोजे भेट 

Featured जळगाव
Share This:
भुसावळ: जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे रुग्ण संख्या वाढत आहे . तसेच अमळनेर नंतर भुसावळ शहर हॉट स्पॉट बनले आहे.  शहरात पोलिस, आरोग्याधिकारि व कर्मचारी यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. नगर परिषदेचे पथक दिवसरात्र गस्त घालत आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांसाठी श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चेरिटेबल तर्फे मास्क व हातमोजे १२ मे रोजी दुपारी न. प. लेखाधिकारि संजय बाणाईत व वैभव पाटील यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आले.
यावेळी रुग्णालयाचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. कुशल पाटील ,श्री कल्याणी चेरिटेबल चे संचालक गौतम चोरडिया, श्री रिदम मेडिकल चे निलेश माळि उपस्थित होते.
यापूर्वी श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चेरिटेबल तर्फे पोलिस व पोलिसांना सहाय्यक असलेल्या स्वयंसेवकांना मास्क व हातमोजे वितरित करण्यात आले आहे.तसेच मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील समाजसेवकांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .
Attachments area
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *