
शिरपूर : जागतिक अपंग दिनानिमित्त मास्क वाटप
शिरपूर :(मनोज भावसार) वरवाडे येथील संत सावता मंदिराच्या प्रांगणात सर्व समाजातील दिव्यांग बांधवांसह महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मास्क वाटप करून मिठाई देण्यात आले.
शिरपूर सावता परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः संत सावता महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिव्यांग बांधवांना सहकार्य करा, त्यांच्या अडीअडचणी समजून घेत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन, मोफत वधू वर परिचय मेळावा घेण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप माळी, कार्याध्यक्ष युवराज माळी, संघटक मंगेश माळी, तालुका कार्याध्यक्ष सतिश माळी, माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी युवा उपाध्यक्ष गौरव सोनवणे, शहराध्यक्ष संदीप देवरे, प्रल्हाद पाटील,हेमंत माळी, रविंद्र माळी केतन पंडीत, गणेश माळी, मधुकर माळी,महारू राजपूत, जगदीश माळी,मनोज माळी, प्रकाश माळी, संतोष माळी, विजय बागुल,संदेश माळी नथा माळी, दत्तात्रय पाटील, उमेश पाटील, बापू पवार, नाना पवार, भूषण माळी, देव माळी, संजय वाघ, रूपेश चव्हाण, बापू माळी पारस माळी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवराज माळी यांनी केले.