मनवेल येथील शेतमजुर महिलांकडून कामावर बहिष्कार टाकण्याचा चौथा दिवस

Featured जळगाव
Share This:

मनवेल येथील शेतमजुर महिलांकडून कामावर बहिष्कार टाकण्याचा चौथा दिवस.

सरपंच जयसिंग पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश.

यावल दि.8(सुरेश पाटील): दगडी व मनवेल येथील शेतमजुर महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी कामावर टाकण्यात आलेला बहिष्कार चौथ्यां दिवशीही कायम दिसुन आला. चर्चेसाठी शेतकरी उपस्थित न राहिल्यामुळे सरपंच जयसिंग पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश आले असले तरी संबंधितांनी शेतकरी व मजूर हिताच्या दृष्टिकोनातून दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे मजूर आणि शेतकरी वर्गात बोलले जात आहे.
वाढत्या महागाई मुळे शंभर रुपये मजुरी महिलांना परवडत नसल्यामुळे गेल्या तीन दिवसापासुन दगडी व मनवेल येथील महिला शेतकरी मजूर कामावर बहिष्कार टाकुन घरीच आहेत तर मनवेल ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढुन सरपंच जयसिंग सोनवणे यांना निवेदन देऊन समस्यां सोडविण्याची मागणी केली होती.

सरपंच जयसिंग सोनवणे यांनी गावातील महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी बसस्थांनक जवळील महर्षि वाल्मिक बसस्थांनक जवळ शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजता हजर राहुन समस्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे तोडगा निघाला नसल्याचे सरपंच जयसिंग सोनवणे यांनी सागीतले.

चार दिवसापासुन मजूर घरीच –

दगडी या आदीवासी गावातील शेत मजुरीच्या दरात वाढ करण्यासाठी काम बंद केल्याने शेतमजूर महिला चार दिवसापासुन घरीच आहे.

साकळी येथील शेत मजुर येतात संध्याकाळी पाच वाजता ४० ते ४५ महिला जमा झाल्या मात्र महिलांच्या रोजंदारीत वाढ करण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्यामुळे महिलांच्या हिरमोड झाला.
रविवार पासुन कामावर टाकण्यात आलेला बहिष्कार कायम असुन बुधवारी सुध्दा काम बंद करुन रोजंदारीत वाढ करण्यासाठी महिलांच्या कामावर जाण्याचा बहिष्कार कायम असल्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *