
मनुदेवीच्या साक्षीने नाल्याची तुलना पाईपासोबत
मनुदेवीच्या साक्षीने नाल्याची तुलना पाईपासोबत.
आर्थिक व्यवहारामुळे आणि प्रभावामुळे नगरपालिका आणि महसूल यंत्रणा झाली आंधळी,
बिनशेती प्रकरणांमधील काळी जादू.
यावल (सुरेश पाटील): यावल नगरपालिका अध्यक्षा यांच्या निवासस्थानापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आणि यावल नगरपालिका कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या यावल एस.टी. बस स्टॅन्ड जवळ श्रीमनुदेवीच्या साक्षीने खोल नाल्यात मातीचा भराव टाकून नैसर्गिक आणि वापराचे पाणी वाहून जात असलेल्या नाल्यात/ सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर शासकीय जागेवर पाईप टाकून खाजगी अनाधिकृत रस्ता तयार करण्याचे धाडस केले त्याकडे आणि आर्थिक व्यवहार आणि प्रभावामुळे नगरपालिका,महसूल,सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल ही सर्व यंत्रणा बिनशेती प्रकरणातील काळया जादूमुळे आंधळी झाल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती,यावल एसटी स्टँड परिसर, आणि विरारनगर मधील तसेच बऱ्हाणपूर-अंकलेश्वर,यावल-चोपडा रोडवरील महामार्गावरील सुमारे एक ते दोन किलोमीटर परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील गटारीतून तसेच रोजचे वापराचे घाण पाणी आणि पावसाचे वाहून जाणारे पाणी याचं नाल्यातून रस्त्यावरून वाहून जात असते परंतु काहींनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी आणि वापर सुरळीत होण्यासाठी मनुदेवी मंदिराजवळील नाल्यात मनुदेवीच्याच साक्षीने सार्वजनिक रस्त्यावर शासकीय जागेवर भराव टाकून पाईप टाकून रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे(एका आपल्या धार्मिक स्थळाजवळ म्हणजे मनुदेवी मंदिराजवळ अनधिकृतपणे अतिक्रमण करून वैयक्तिक स्वार्थ साधावा असे कोणत्या पंथात म्हटले आहे याबाबत जाणकारांनी आत्मचिंतन करावे)तरी हे काम यावल नगरपालिका,यावल महसूल विभाग,सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांनी तत्काळ संयुक्तिकरीत्या किंवा जवाबदार विभागाने बंद न पाडल्यास किंवा संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास विद्यमान संबंधित अधिकारी वैयक्तिकरीत्या,शासकीय अधिकारी म्हणून पुढील कार्यवाहीस जबाबदार राहतील याची नोंद त्यांनी घ्यावी असे तक्रार दारामध्ये बोलले जात आहे.