
मनोज वाजपेयी, रणदीप हुडा, राणा दग्गुबती आणि नीरज पांडे करणार डिस्कव्हरी इंडियासाठी करणार कार्यक्रम
मुंबई (तेज समाचार डेस्क): डिस्कव्हरी+ भारतासाठी नवीन विशेष कार्यक्रम घेऊन येत असून यासाठी त्यांनी मनोज वाजपेयी, राणा दग्गुबती, रणदीप हुडा आणि नीरज पांडे यांच्यासोबत हात मिळवणी केली आहे. बॉलिवुडमधील ही सर्व मोठी नावे घेतल्याने डिस्कव्हरी+ ला भारतात आणखी यश मिळेल असे वाटत आहे. डिस्कव्हरी+ ओरिजनल्स अंतर्गत राणा दग्गुबतीसोबत ‘मिशन फ्रंटलाईन’, रणदीप हुडासोबत ‘लडाख़ वॉरियर्स- द सन्स ऑफ द सॉईल’ आणि नीरज पांडे द्वारा निर्मित आणि मनोज वाजपेयी होस्ट असलेला ‘सिक्रेटस ऑफ सिनौली- डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी हे नवीन विशेष कार्यक्रम घेऊन येत आहे. हे चारही कार्यक्रम अत्यंत विशेष असणार आहेत.
डिस्कव्हरी+ मंगळवार 9 डिसेंबरपासून अनेक नवीन ओरिजनल मालिका सुरू करणार आहे. सध्या डिस्कव्हरी+ वर वेगवेगळ्या प्रकारचे 600 पेक्षा जास्त शोज प्रसारित केले जात आहेत. मात्र पुढील वर्षी यात आणखी वाढ करण्याचा डिस्कव्हरीचा विचार असून 200 पेक्षा जास्त नवीन आणि एक्स्क्लुझिव्ह (प्रादेशिक व जागतिक) कार्यक्रम आणले जाणार आहेत.लडाख वॉरियर्स (Ladakh Warriors)- द सन्स ऑफ द सॉईलमध्ये भारतीय सेनेचे ‘स्नो वॉरियर्स’ म्हणून ओळखले जाणारे लडाख़ स्काउटस भारत व चीनमधील अतिशय महत्त्वपूर्ण सीमांपैकी एका सीमेचे संरक्षण करते. रणदीप हुडाद्वारे प्रस्तुत या कार्यक्रमात जगातील सर्वाधिक उंचीच्या रेजिमेंटल केंद्रावरील स्नो वॉरियर्सच्या खडतर प्रशिक्षणाची माहिती देण्यात येणार आहे. 9 डिसेंबर 2020 रोजी या डॉक्यूमेंट्रीचे प्रसारण डिस्कव्हरी+ वर केले जाणार आहे. या कार्यक्रमाबाबत माहिती देताना रणदीप हुडाने सांगितले, “सीमेवरील सर्व जवानांचा आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांचा मी चाहता आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हिम सैनिकांचा गौरव करीत आहोत. माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.”मिशन फ्रंटलाईन (Mission Frontline) मध्ये देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर लढणा-या सैन्यदलातील हीरोंचे दर्शन घडवले जाणार आहे. यात राणा दग्गुबती सैनिकाच्या खडतर आयुष्याचा अनुभव घेताना आणि सीमा सुरक्षा दल आणि सीमेवरील जवानांसह जैसलमेर येथे जाऊन तेथून सैनिकांचे काम दाखवणार आहे. या कार्यक्रमाबाबत बोलताना राणा दग्गुबतीने म्हटले, “बीएसएफ जवानांसोबत राहण्याची संधी मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. मी चित्रपटात सैनिकाची भूमिका केलेली असल्यामुळे मी निश्चितपणे म्हणू शकतो की, रीळ लाईफपेक्षा सैनिकाचे ‘रिअल लाईफ’ अतिशय वेगळे असते. तेच आपले खरे हिरो आहेत. ते देशासाठी जे करतात त्याची आपण कल्पना करू शकत नाही.”
सिक्रेटस ऑफ सिनौली (Secrets of Sinauli)- डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी हा कार्यक्रम नीरज पांडेची प्रस्तुती असून याचे अँकरिंग मनोज वाजपेयी करीत आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सादर केल्या जात असलेल्या या कार्यक्रमात सिनौली (उत्तर प्रदेशातील एक गांव) येथील उत्खननामधील गूढ बाबी उघड करून दाखवण्यात येणार आहेत. या शोधाची पार्श्वभूमी, तेथे आढळलेले अवशेष आणि हे काम सुरु असताना टप्प्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांची मुलाखत घेण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाबाबत बोलताना मनोज वाजपेयीने सांगितले, “’या कार्यक्रमाचा भाग बनणे मला सर्वार्थांनी समृद्ध करून गेले. यामुळे प्राचीन भारताविषयी मला खूप काही शिकायला मिळाले. सिनौलीतील पुरातत्त्वीय शोधांमुळे आपल्याला आपल्या इतिहासाविषयी अनेक गोष्टी तर कळतातच चार हजार पेक्षा अधिक वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतींची माहितीही मिळते. मला माहिती आहे की हे उत्खनन फक्त शिखराचे टोक आहे अजून भारतीय इतिहासाबाबत खूप काही शोधले जाणे बाकी आहे. सिनौली उत्खनन तर अतिशय थरारक आहे.” असेही मनोजने सांगितले.