१० वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक

जळगाव
Share This:

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि):  शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसर्‍या मजल्यावर एका १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला इंद्रप्रस्थ नगरमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी अटक केली. सौरभ वासुदेव खरडीकर (२५, रा. राधाकृष्ण नगर) या संयशिताचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शहरात पिडीत मुलगी आपल्या आजीसोबत गोलाणी मार्केटसह इतर भागातून भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने गोलाणी मार्केटलगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे उभे असलेल्या पिडीत मुलीला तुला खाऊ देतो म्हणून तिसर्‍या मजल्यावर नेले. त्यानंतर तिसर्‍या मजल्यावरील एका मुतारीत नेत त्या व्यक्तीने पिडीत मुलीवर पाशवी अत्याचार केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला. पिडीत मुलगी रक्ताने माखलेल्या कपडयांवर रडत रडत खाली आपल्या आजीकडे आली आणि सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर आजीने पिडीत नातीला सोबत शहर पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी गोलाणी मार्केटमधील दुसर्‍या मजल्यावरील ‘तरुण भारत’ कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पिटीत मुलगी दिसून आली होती. त्यानुसार पोलिसांनी बालाजी प्लेसमेंट बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आरोपी त्यात पिडीत मुलीसोबत कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे सौरभ वासुदेव खरडीकर (२५, रा. राधाकृष्ण नगर) अशी आरोपीची ओळख पोलिसांना पटली. त्यानुसार त्याला दुपारी इंद्रप्रस्थ नगरमध्ये फिरत असतांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी तरुणाने आपल्या कृत्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *