मामा पाठोपाठ दोघ भाचे कोरोनाग्रस्त

Featured जळगाव
Share This:

मामा पाठोपाठ दोघ भाचे कोरोनाग्रस्त

विरारनगर सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र.

यावल  ( सुरेश पाटील ): यावल तालुक्यात गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्त एका लोकप्रतिनिधीचे यावल येथील राहणार दोघं भाचे सुद्धा आज दिनांक 6 जुलै 2020 सोमवार रोजी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले त्यामुळे आता विरारनगर सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाणार.
यावल तालुक्यात कोरोना विषाणूची बाधा व दुष्परिणाम राजकीय लोकप्रतिनिधीसह पंचायत समिती एक सदस्य, जिल्हा परिषद एक सदस्य,1 पोलीस पाटील, 1 पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी,1 पोस्टमास्तर अधिकारी, काही न्यायालयीन कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य काही डॉक्टर, वकील, पत्रकार यांच्यासह इतर स्त्री-पुरुष नागरिक यांना दिसुन आले आहे.
आज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी पुन्हा दोन युवक कोरोना बाधित आढळून आल्याने यावल शहरासह तालुक्यातील ठेकेदारी वर्गात आणि नगरपालिका कर्मचारी व नगरसेवक वर्गात एकच खळबळ उडाली आहे. हे दोन तरुण आपल्या मोठ्या व्यवसायानिमित्त अनेकांच्या संपर्कात आलेले असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून यावल शहरात आणखी कोणाकोणाचे कोरणा पॉझिटिव रिपोर्ट येतात याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे तसेच कमी लोकसंख्या असलेल्या साकळी गांवातील कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे आता यावलकरांना त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *