मलिंगाला आठवून जसप्रीत बुमराह झाला भावूक,

Featured मुंबई
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क). भारतीय संघाने कांगारूंना पराभवाची धूळ चारून मालिका खिशात घालत ऐतिहासिक विजय मिळवला. सर्व संघातील खेळाडू आनंदी आहेत. मात्र भारतीय संघाचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह मात्र काहीसा दु:खी आहे. बुमराहने एक भावनिक ट्विट केलं आहे. इतक्या वर्षे तुझ्या साथीने क्रिकेटच्या मैदानावर खेळलो याचा मला अभिमान आहे. तुझी विचार करण्याची शैली तू मला शिकवलीस त्यासाठी तुझे खूप आभार, माली, असं जसप्रीत बुमराहने म्हटलं आहे.

मुंबईच्या संघातील बुमराहचा सहकारी गोलंदाज लसिथ मलिंगाने  फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बुमराहने भावनिक ट्विट केलं आहे. दरम्यान, बुमराह संघात नवीन आला असताना मलिंगा संघाचा प्रमुख गोलंदाज होता. सराव सत्रात मलिंगाच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे बुमराहला आपल्या गोलंदाजीची धार वाढण्यास मदत झाली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *