
मालेगावच्या कोरोनाबाधितांना नाशिकमध्ये आणू नका
नाशिक(तेज समाचार डेस्क). राज्यामध्ये मुंबई पुणे नंतर जर कुठे कोरोनाचा प्रादूर्भाव असेल तक ते आहे मालेगाव. इथे एक प्रकार कोरोना विस्फोट ची सज्ञा दिली जात आहे. तरी सुद्धा इथे अजून ही कोरोनाबाधिंतावर उपचाराची अवी तशी व्यवस्था केली गेली नाही. या कारणाने मालेगावच्या रुग्णांना नाशिक मध्ये उपचारा साठी आणले जात आहे. या गोष्टीचा नाशिकच्या जनप्रतिनिधिंमार्फत विरोध होत आहे. या जनप्रतिनिधिंचे म्हणणे आहे कि मालेगावातील रुग्णांवर तिथेच उपचार करावेत. या संदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या तीन आमदारांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदन केले आहे.
– जिल्ह्यात रुग्णांची संख्या ५००चा वर
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५००हून अधिक झाली आहे. मालेगावातील रुग्णसंख्या सर्वाधित आहे. नाशिकमध्ये कोरोनाबाधितांचे ‘मालेगाव कनेक्शन’ आधीच स्पष्ट झाल्यानं नाशिककरांची चिंता वाढली आहे. त्यात आता प्रशासनानं मालेगाव येथील बाधित रुग्ण नाशिकच्या आडगाव येथील डॉ. वसंत पवार मेडिकलमध्ये उपचारासाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरातील भाजप लोकप्रतिनिधिंनी यास विरोध केला आहे. महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेतली आणि मालेगावचे रुग्ण नाशिकमध्ये आणू नयेत, अशी विनंती केली.
– तर स्थिति हाथाबाहेर होईल
नाशिक शहरात मालेगावसारखा प्रादुर्भाव वाढला तर, नाशिकमध्ये आतापर्यंत नियंत्रणात असलेली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. पुढील काळात नाशिकमध्ये आवश्यकता भासली तर, येथील रुग्णांची व्यवस्था कुठे करणार, असा प्रश्न भाजप आमदार राहुल ढिकले यांनी उपस्थित केला. बाहेरील रुग्ण नाशिकला आल्यास त्यांच्यामार्फत संसर्ग वाढल्यास याचा त्रास सर्व नाशिकला होणार आहे. नाशिकमधील अनेक लोकवस्त्या या दाट असून, येथे कोरोनाचा वेगानं फैलाव होऊ नये यासाठी आमचा विरोध असल्याचं आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं.