मालेगावा: आढळले 8 नवीन रुग्ण – करोनाग्रस्त रूग्णांची संख्या 126 वर

Featured नाशिक
Share This:

मालेगावा: आढळले 8 नवीन रुग्ण – करोनाग्रस्त रूग्णांची संख्या 126 वर

मालेगाव (तेज समाचार डेस्क) : मालेगाव शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज प्राप्त अहवालानुसार शहरातील ८ रुग्ण करोना बाधित आढळले असून यामध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.शहरात करोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. यात  आज दुपारी प्राप्त अहवालानुसार पूर्व  भागातील ८ रुग्ण बाधित आढळले आहेत. यामध्ये ६ पुरुष तर दोन महिलांचा समावेश असून महिलांमध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचा  समावेश आहे. मालेगाव शहरातील बाधित रुग्णांची संख्या १२६ वर गेली असून यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *