मालेगावात आढळले 5 नवीन करोना रुग्ण – रुग्ण संख्या पोहचली 67 वर

Featured नाशिक
Share This:

मालेगाव (तेज समाचार डेस्क):  मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील एकूण ५ रुग्ण करोना बाधित आढळले आहे. शहरातील रुग्णांची संख्या ६७ झाली असून यात ४ रुग्ण दगावले आहे. आज मिळालेल्या आकडेवारीनुसार मालेगाव  शहरात आज ५ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात ५ रुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. यातील ५ ही रुग्ण पुरुष असून यात एका १८ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. नाशिक शहरात ४ नवीन रुग्ण आढळून आले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *