
मालेगाव: एकाच कुटुंबातील 6 जण करोना पॉझिटिव्ह
मालेगाव (तेज समाचार डेस्क): धुळे शहरातील एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा सकाळी मृत्यू झाला असून आज सायंकाळी प्राप्त अहवालानंतर तो व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. धुळे जिल्ह्याची करोनाग्रस्तांची संख्या १६ वर गेली असून चार जणांचा यात मृत्यू झाला आहे. इतर रूग्णांवर हिरे वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. मालेगाव शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज दि.२४ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार ६ रुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले. तर काल दि.२३ एप्रिल रोजी दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ३ रुग्ण करोना बाधित असून दोघं रुग्ण हे संशयित आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या ११६ वर गेली असून यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दि.२४ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार ६ रुग्ण करोना बाधित आढळले आहे. हे सर्व रुग्ण संगमेश्वर भागातील एकाच कुटुंबातील आहेत. यामुळे शहरातील रुग्णांची संख्या ११६ इतकी झाली आहे. यातच शहरातील मृतांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. काल दि.२३ रोजी मालेगाव शहरात दिवसभरात १४ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून या १४ रुग्णांमध्ये एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार शहरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात २ रुग्ण करोना बाधित असून २ रुग्ण संशयित आहेत. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून यात ३ करोना बाधित रुग्ण असल्याने मृत रुग्णांची संख्या १२ झाली आहे. दोघा संशयित रुग्णाचा अहवाल प्रलंबित असून त्यांचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या ११६ झाली असून यातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.