महसुलने मंडप टाकलेल्या गावात पावसाळ्यात वाळू तापली

Featured जळगाव
Share This:

महसुलने मंडप टाकलेल्या गावात पावसाळ्यात वाळू तापली.

थोरगव्हाण येथे शेतकऱ्यांनी वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर शेतात अडवला या कारणावरुन दोन गटात हाणामारी चार जख्मी पाच जणांना अटक

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील थोरगव्हाण येथे महसूल विभागाने गेल्या महिन्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी मंडप टाकून मोठा देखावा केला होता परंतु दि.10 रात्री मोटरसायकल रस्त्यात आडवी का उभी केली या कारणांवरून दोन गटात शाब्दिक चकमक व नंतर झालेल्या वादात चार जणं जख्मी झाले असुन याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन,यातील दोघ गटातील भांडणखोर मंडळीने एकामेकांच्या विरूद्ध परस्पर तक्रार दिल्याने या सर्वांना अटक करण्यात आली आहे.या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार प्रथम तक्रारीत म्हटले आहे की मी दि.10जुलै रोजी रात्री7वाजुन45मिनिटांनी थोरगव्हाण शिवजवळ रामेश्वर किशोर पाटील वय19वर्ष आपल्या शेतातुन दिवाबत्ती करून येत असतांना तेव्हा आमच्या मोटरसायकल जवळ येवुन समाधान मंगल सोनवणे,निलेश समाधान सोनवणे,योगेश लहु सोनवणे व सुनिल रामकृष्ण सोनवणे सर्व राहणार थोरगव्हाण तालुका यावल यांनी म्हटले की तुम्ही रस्त्यात का मोटरसायकल उभी केली आहे आमचे वाळुचे ट्रॅक्टर येत आहे असे बोलुन शिवीगाळ करून यातील समाधान सोनवणे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने दिनेश अशोक पाटील यांच्या डोक्यावर आणी छातीवर मारहाण करून दुखापत केली तसेच त्यांच्या सोबत असलेले योगेश सोनवणे व सुनिल सोनवणे यांनी माझ्या सोबत असलेले प्रविण भागवत पाटील यांना लाकडी काठीने हातावर आणी पाठीवर मारहाण करून दुखापत केली व वाळुने भरलेले ट्रॅक्टर त्याच ठिकाणी खाली करून त्या ठिकाणाहुन निघुन गेलेत या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन,तर दुसऱ्या तक्रारीत समाधान मंगल सोनवणे यांनी म्हटले आहे की दि.10 जुलै रोजी रात्री7:45वाजेच्या सुमारास मी थोरगव्हाण गाव शिवजवळ आपल्या कडील मोटरसायकल क्र.MH-19DD7182ने शेतातुन घरी येत असतांना ज्ञानेश्वर पाटील,रामेश्वर पाटील,गणेश पाटील,प्रविण पाटील सर्व रा. थोरगव्हाण यांनी सर्वांनी मिळुन माझी मोटरसायकल अडवुन माझ्या शाब्दीक वाद घालुन शिवगाळ करून यातील प्रविण पाटील व रामेश्वर पाटील याने लाथाबुक्याने व त्याच्या हातातील लाकडी काठीने पाठीवर पायावर मारहाण करून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली समाधान सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन,या दोघ मारहाणीच्या घटनेतील 5जणांना अटक करण्यात आली असुन तपास पोलीस निरिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हॅ.कॉ.गोरख पाटील हे करीत आहे.दरम्यान महसुल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे यावल व परिसरात शनिवार आणी रविवार या दिवस मोठया प्रमाणावर वाळु माफीयाच्या माध्यमातुन सर्रास वाळुची बेकाद्याशीर वाळुची मोठया प्रमाणावर वाहतुक केली जात असल्याचे पुनश्व वाळू प्रकरण तापले असल्याचे तसेच अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे आणि महसूल ने टाकलेल्या मंडपाचा परिणाम काय झाला? या वादातुन अनेक प्रश्न निष्पन्न होत असुन,महसुल प्रशासन पुन्हा मंडप टाकून आपल्या कर्तव्यदक्ष ते चा देखावा करणार आहे का याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *