यावल नगर परिषदेत विषय समित्यांवर सभापती म्हणून महिलाराज

Featured जळगाव
Share This:

यावल नगर परिषदेत विषय समित्यांवर सभापती म्हणून महिलाराज

यावल (सुरेश पाटील): येथील नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापतींची आज निवड करण्यात आली, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सौ कल्पना दिलीप वाणी, शिक्षण समिती सभापती पदी सौ रेखा युवराज चौधरी,आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी श्रीमती शमशाद बेगम महम्मद खान,
महीला व बालविकास समितीच्या सभापतीपदी श्रीमती सईदाबी शेख हारूण, तसेच पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्ष सौ.नौशाद मुबारक तडवी आणी उपनगराध्यक्ष सौ.रूख्माबाई नथ्थु भालेराव या आहेत. याप्रमाणे यावल नगरपरिषदेत विषय समिती सभापतीपदी महिला सदस्यांची वर्णी लागली.
आज यावल नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दिनांक८जानेवारी2021 रोजीच्या आदेशानुसार पिठासीन अधिकारी म्हणून यावलचे तहसीलदार महेश पवार आणी मुख्याधिकारी बबन तडवी नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय समितीच्या सभापती निवड विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष सभेत एकुण15 नगरपरिषद सदस्यानी भाग घेतल्याने कोरम पुर्ण होवुन नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदांची निवड करण्यात आली.
आजच्या या विषय समिती सभापती निवडीच्या विशेष सभेत नगरसेवक व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंत पाटील,नगरसेवक प्रा.मुकेश पोपटराव येवले,नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते,नगरसेवक अस्लम शेख नबी,नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,सौ.पौर्णीमा राजेन्द्र फालक,श्रीमती शिला श्रीधर सोनवणे, मनोहर सोनवणे यांनी आपला सहभाग नोंदविला असुन, नवर्निवाचीत विषय समित्यांच्या सभापतींचे यावेळी पिठासिन अधिकारी व तहसीलदार महेश पवार व उपस्थित सर्व सन्मानिय नगराध्यक्ष सौ.नौशाद तडवी गटनेते अतुल पाटील,प्रा.मुकेश येवले यांच्यासह उपस्थित नगरसेवकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावल शहरातील विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांच्या पाणी,रस्ते,गटारी साफ-सफाईसह विविध प्रलंबीत समस्या आणी विकास कामांकडे अग्रक्रमांकाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा यावलकराकडुन व्यक्त करण्यात येत आहे.


यावल नगर परिषदेवर महिला अध्यक्ष व सदस्य यांची(त्यांच्या पति सह)घट्ट पकड.

यावल नगर परिषद अध्यक्षपद आरक्षण असल्यामुळे सौ.नोशाद मुबारक तडवी यांच्याकडे आहे, त्याच प्रमाणे आज झालेल्या सभेत यावल नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदी यावल न.पा महिला सदस्यांचीच सभापती म्हणून निवड झाली तसेच यावल नगरपरिषदेत नगर परिषदेचे कामकाज करताना आणि अनेक कार्यक्रमांसह न.पा. कार्यालयात यावल नगर परिषदेतील महिला न.पा.सदस्यांचे काही पती महाशय माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष कामकाज पाहत असल्याने यावल शहरात विकास कामे होत असल्याने(गुणवत्ता काही असो) समाधान व्यक्त करण्यात येते असलेतरी यावल नगर परिषदेवर महिला अध्यक्ष व सदस्य यांची(त्यांच्या पति सह)घट्ट पकड झाल्याचे बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *