शिक्षक भारती संघटना नंदुरबार च्या जिल्हाउपाध्यक्ष पदी महेश नांद्रे, संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सुर्यवंशी यांची निवड

Featured नंदुरबार
Share This:

शिक्षक भारती संघटना नंदुरबार च्या जिल्हाउपाध्यक्ष पदी महेश नांद्रे, संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सुर्यवंशी यांची निवड

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : नंदुरबार येथील शिक्षक भारती या संघटनेच्या नंदुरबार जिल्ह्याच्या कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्ष पदी महेश नांद्रे , संघटक पदी तुषार सोनवणे तर सहकार्यवाह पदी पुष्कर सूर्यवंशी यांची एक मताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राहुल पाटील व कार्याध्यक्ष आशिष दातीर यांच्या सहिने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
महेश नांद्रे, तुषार सोनवणे, पुष्कर सुर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन,विनाअनु, शाळा,अतिरिक्त शिक्षक, जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. जुनी पेंशन, विनाअनुदानित शाळांना अनुदान, अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लागावे यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात ते नेहमी सहभाग राहिला आहे. ह्या कामाची दखल घेत त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न ते संघटनेचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांच्या मार्फत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षक भारतीचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिक्षक भारती संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, इकबाल शेख उमर आशिष दातीर, राजेश जाधव, सतिष मंगळे, गोरख पाटील, संजय पाटील, असंख्य शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *