महेलखेडी ग्रामस्थ अनेक समस्यांनी ग्रस्त

Featured जळगाव
Share This:

महेलखेडी ग्रामस्थ अनेक समस्यांनी ग्रस्त

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील महेलखेडी गावात अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले असून मोठा तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
महेलखेडी गाव हागणदारीमुक्त झाले आहे परंतु सार्वजनिक शौचालयाचे बारा वाजल्याने सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती होत नसल्याने महिलांना प्रातःविधीसाठी पुन्हा उघड्यावरच बसण्याची वेळ आली आहे,गावात सार्वजनिक वापराच्या ठिकाणी झाडें झुडपे,त्याच ठिकाणी कूपनलिका असून बंद अवस्थेत आहे,त्याच प्रमाणे गावात गुरेढोरे यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था असलेल्या हौदाची अतिशय दैना अवस्था झाली आहे त्याच ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची टाकी असून तिला सुद्धा गळती लागली आहे पाण्याच्या टाकीवर शेवाळे निर्माण झालेली आहेत त्यातील बहुतांशी नळ हे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते,यासह गावात अनेक समस्या व दयनीय अवस्था निर्माण झालेल्या आहेत आहे, पुरुष व महिला शौचालय बंद अवस्थेत आहेत तरी आता या ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून एक हाती सत्ता स्थापन झाली असून सत्ता महिलांच्या हाती आल्याने महेलखेडी ग्रामपंचायत महिलांचे प्रश्न मार्गी लागतील या आशेने महिला वर्गात उत्साह निर्माण असून गावाचा विकास म्हणजेच परिवर्तन घडुन कधी येणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे,सध्या कोविड19असून गावात उपाय योजना तत्काळ करणे गरजेचे असल्यावर सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे तरी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य,लोकप्रतिनिधी यांनी लक्ष केंद्रित करून महेलखेडी ग्रामस्थांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *