यावल : महावितरण करणाऱ्याला मारहाण करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव
Share This:

यावल (सुरेश पाटील). शहरातील विरारनगर परिसरात घरगुती विज बिलाची रक्कम भरणा करा अन्यथा तुमचे विज कनेक्शन तोडले जाईल अशी सुचना देण्यासाठी गेलेल्या एका महावितरणच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन यावल पोलीसात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील विरारनगर परिसरात आज दि.20 जुलै मंगळवार रोजी सकाळी10:30 वाजेच्या सुमारास यावल येथील महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणुन सेवेत कार्यरत असलेले योगेश सुधाकर करनकर वय41 वर्ष हे आपले सहकारी किरण रोहीदास बागुल यांच्या सोबत विजवसुलीच्या थकबाकी साठी गेले असता विज ग्राहक रफीक, फरदीन,मुन्ना व एक महीला यांनी योगेश करनकर हे उर्वरीत विजबिलची रक्कम 1141 रुपये भरणा करण्याची सुचना देत असतांना घरातील महीला हिने आपल्या हातातील पाणी भरण्याच्या नळीने शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच त्या ठीकाणी उपस्थित रफीक, फरदीन,मुन्ना पुर्ण नांव माहीत नाही यांनी कर्मचारी योगेश करनकर यांची कॉलर पकडून ओढताण करून शिवीगाळ करून धमकी देवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.या संदर्भात योगेश सुधाकर करनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन,तपास सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण हे करीत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *