महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे

Featured नंदुरबार
Share This:

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे.त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातहीकोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे.भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदन पाठविले.सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधाविधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. यासरकारचाप्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळेप्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही.

वरील प्रमाणे सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रामधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनानिवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनहीकरण्यात आलेहोते. परंतु तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे दिनांक १२/१०/२०२० रोजी भाजपामहिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे; तरी महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्यात यावी.

यावेळी निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, खासदार हिनाताई गावित, जिल्हा उपाध्यक्ष सानुबाई वळवी, डॉक्टर सपना अग्रवाल, संगीता ताई सोनवणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी ताई सोनार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतिभा पवार, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, नंदाताई सोनवणे, भावनाताई लोहार आदी.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *