टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; बीडमधला संशयित फरार!

Featured मुंबई
Share This:

 

मुंबई  (तेज समाचार डेस्क): ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. याचे धागेदोरे महाराष्ट्रात असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीडच्या शंतनु मुळुक या तरुणाचे नाव पोलिसांनी या प्रकरणात पुढे आणले आहे. शंतनु राहात असलेल्या बीडच्या घरी पोलीस तपास करण्यासाठी पोहोचले आहेत.

शंतनु हा सध्या फरार असून, त्याच्या आई वडिलांची चौकशी पोलीस करत आहेत. बीडच्या चाणक्यपुरीमध्ये राहणाऱ्या शंतनुने ते ‘गुगल टूलकिट’ बनवून आणखी दोघांनी ते एडिट केल्याचा आरोप आहे. शनिवारी झालेल्या दिशा रवी अटकेनंतर आता या प्रकरणात अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या तसेच सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांचं ही या प्रकरणात नाव पुढे आलं आहे. त्यासंदर्भात निकिता विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. समाज माध्यमावर पसरवलं गेलेलं ते गुगल टूलकिट बनवण्यात निकिताचाही हात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी २१ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक झाल्यानंतर टुलकिटचे महाराष्ट्र कनेक्शनही उघड झाले आहे. दिशानं पसरवलेलं टुलकीट ग्रेटा थनबर्गनं आपल्या सोशल मीडिया खात्यावरुन शेअर करुन नंतर ते डिलीट केलं होतं. तिच्या अटकेचे पडसाद देशभरात उमटले असून, काँग्रेससह शेतकरी आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *