दोंडाईचा : लोटीस आलमचा विजेच्या टावरला चिपकून अपघाती मुत्यू

Featured जळगाव
Share This:

लोटीस आलमचा विजेच्या टावरला चिपकून अपघाती मुत्यू…

महावितरण कंपनीच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बिहारच्या तरूण जीवास गेला

दोंडाईचा (तेज समाचार डेस्क): येथे दोंडाईचा शहादा बायपास रस्त्यावरून शहादा गावाकडे डबल लाईन टाकण्यासाठी टावरचे काम सुरू आहे. त्यात काल दिनांक १२ जुन शनिवार रोजी दुपारी बारा वाजता शहादा रस्त्यावरील टावरचे काम सुरू असताना बिहारचा तरूण मजूर लोटीस आलम कय्यासली आलम (वय२३) हा काम करत असताना बंद असलेल्या टावरवर अचानक विजेच्या सप्लाय मिळाल्याने जागेवर चिपकून मयत झाला आहे. यावेळी तरूणाच्या मुत्यूबाबत ठेकेदाराचा निष्काळजीपणाचे कारण पुढे येत असुन तरूणाच्या मुत्यूस जबाबदार धरले जात असल्याच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे.

याबाबत स्थानिक पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या दोंडाईचा-शहादा रस्त्यावर डबल लाईन टाकण्यासाठी टावरचे काम सुरू आहे. यासाठी पारेषण कंपनीने अकोला व पुणे येथील ठेकेदाराला टावर व विधुत तारा टाकण्याचे काम दिले आहे. ह्या कामासाठी ठेकेदाराने बिहार येथील तरूण मजूर म्हणून आणले होते. त्यात काल शहादा रस्त्यावरील टावरवर लोटीस आलम कय्यासली आलम हा तेवीस वर्षाचा मजूर चढलेला असताना अचानक आलेल्या विधुत सप्लायने टावरवर चिपकून त्याचा मुत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत कामावर असलेल्या गावातील मजूरांनी खाली उतरवत दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी श्री नरोटे यांनी तपासून मुत्य घोषित केले. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला काल उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस हवलदार जाधव करत आहे.

यावेळी घटनास्थळी मयत तरूणाच्या मुत्यूस ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचे कारण उपस्थित मजूर व नागरिक देत होते. जर टावरचे काम सुरू असताना ठेकेदाराने विधुत सप्लाय बंद असल्याची खात्री केली असती तर तरूण मजूराचा मुत्यू झाला नसता,असा कयास उपस्थितांकडून लावला जात आहे व तरूणाच्या मुत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *