श्रीरामाच्या फोटोवर लघवी करत असतानाचा फोटो फेसबुकवर व्हायरल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल.

Featured जळगाव
Share This:

चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना, आरोपी अटक.

यावल (सुरेश पाटील) जगभरातील कोट्यावधी राम भक्तांना प्रेरणा देणाऱ्या श्रीरामाच्या फोटोवर लघवी करत असतानाचा फोटो फेसबुकवर व्हायलर करणाऱ्या चोपडा तालुक्यातील अडावद येथील एका दृष्ट प्रवृत्तीच्या रावणा विरुद्ध तथा आरोपीविरुद्ध आज दुपारी 15 वाजता अडावद तालुका चोपडा येथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील राम भक्त नागरिकात,भाविकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

अडावद तालुका चोपडा येथील नंदलाल मोतीलाल महाजन वय 37 यांनी अडावद पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अडावद तालुका चोपडा येथील शेख इक्बाल शेख निमन यांनी आज दिनांक 16 ऑगस्ट 2020 रविवार रोजी सकाळी 11 वाजता इक्बाल शेख नांवाचे मोबाइल फेसबुक अकाउंट वरून हिंदू धर्माचे दैवत असलेले श्रीरामाचे फोटो वर लघवी करत असतानाचा फोटो व्हायलर करून हिंदू धर्मातील लोकांचे धार्मिक भावना दुखावल्या आहेत व हिंदू समाजाचे लोकांमध्ये रोष व चीड निर्माण झाली आहे म्हणून या कारणावरून अडावद पोलीस स्टेशनला भाग5 गुन्हा रजिस्टर नंबर 35 /2020 भा.द.वी. कलम 295 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असली तरी याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपी विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *