
धुळे महानगरपालिका हद्दीत 31 मे पर्यंत लॉक डाऊन- जिल्हाधिकारी संजय यादव
धुळे महानगरपालिका हद्दीत 31 मे पर्यंत लॉक डाऊन- जिल्हाधिकारी संजय यादव
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, लॉक डाऊनचे पालन करावे
धुळे (तेज समाचार डेस्क): मुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर विशेषतः व्हाट्स ऍपवर फिरणाऱ्या
खोट्या, निराधार मजकुराकडे दुर्लक्ष करून संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करीत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून धुळे महानगरपालिका हद्दीत 31 मे 2020 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यातून काही अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
मात्र, आज दुपारपासून व्हाट्सएपवर सवलती मिळणार असल्याचा संदेश फिरत आहे. तो संपूर्ण खोटा व निराधार आहे. असा कोणताही निर्णय धुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. 31 मे 2020 नंतर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे योग्य ते निर्णय घेऊन जनजीवन सुरळीत करणेसाठी प्रयत्न करण्यात येतील. असे बदल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत रित्या विविध माध्यमातून प्रसिद्धीसाठी देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, व प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.