पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये 13 जुलै पासून सख्तीचे लॉकडाउन, भाजी-पाला खरेदी करून ठेवा
पुणे (तेज समाचार प्रतिनिधि) पुणे आणि पिंपरी शहरात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. सोमवार 13 जुलै मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होईल. लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले..
पुणेकरांनी भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करुन घ्यावी. आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या सेवाच सुरु राहतील.
इतर कुठलीही अॅक्टिव्हिटी सुरु राहणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
22 गावांमध्ये कोरोनाच्या केसेस अधिक आहेत. त्यात आणखी गावे समाविष्ट होतील. एखाद्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण असतील, तर पूर्ण लॉकडाऊन करणार, मात्र उद्योग पूर्ण बंद करायचे नाहीत, असं अजित पवार यांनी सांगितलंय.
18 जुलैनंतर काय सुरु राहील त्याबाबत दोन दिवसात नवीन सूचना देण्यात येईल. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ऑनलाइन पास दिला जाईल, असंही अजित पवार यांनी म्हटलंय.