
वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र- हजेरीसाठी वेळ वाढवून द्या
मुंबई (तेज समाचार डेस्क) : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) या मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाच्या चौकशीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षा राऊत यांनी सोमवारी रात्रीची ईडीला (ED) यासंदर्भात पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी चौकशीला हजर होण्यासाठी अधिकचा अवधी हवा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजवर्षा राऊत आज ईडीसमोर हजर होणार का? याबाबत संभ्रम कायम आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षी राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्याची माहिती ईडीच्या दिल्लीतील सूत्रांनी दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापू लागले. सोमवारीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीने गेल्या दीड महिन्यात काही कागदपत्रांची विचारणा केली होती. त्यांची पुर्तताही आपण केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदे सांगितले. पण आज वर्षा राऊत यांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलंयय त्यामुळे त्या आजच चौकशीला जाणार का.? या सदर्भात अजूनही संभ्रम अवस्थाच आहे.
वर्षा राऊत या चौकशीला जाणार की नाही याचा निर्णय शिवसेना ठरवेल. असं उत्तर संजय राऊत यांनी पत्रकार परीषदेत दिले होते. त्यामुळे आज काय घडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.