
तक्रारीची चौकशी होऊ द्या. चौकशांना कधीही घाबरत नाही – माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
तक्रारीची चौकशी होऊ द्या. चौकशांना कधीही घाबरत नाही – माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार (वैभव करवंदकर ) : कोविड-19 ह्या विषाणूची लागन झालेल्या रुग्णांना रेमेडिसिवीर इंजेक्शन रोटरी वेलनेस सेंटर मार्फत उपलब्ध होत होते. खासदार डॉ. हिना गावित यांनी तक्रार केल्यामुळे चौकशी सुरु झाली.त्या चौकशीला आम्ही घाबरत नाही. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की रोटरी वेलनेस सेंटरने ५ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकत आणले होते. त्यातील १ हजार इंजेक्शन शासनाने उपलब्ध करून दिले. शासनाकडून घेतलेले १ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन ५९४ रुपयांना घेतले; तेच आम्ही ५५० रुपयांना रुग्णांना उपलब्ध करुन दिले. रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जिल्हयातील गरजूंना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची सोय आम्ही केली होती. परंतु खासदार डॉ. हिना गावित यांच्या तक्रारींमुळे रेमडेसिव्हिर वाटप बंद झाल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गरजूंना रेमडेसिविर वाटप करत असतांना भेदभाव केला नाही. याउलट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्वात जास्त उपलब्ध करून दिले. कोरोना पक्ष, जात, धर्म पाहून होत नाही. रोटरी वेलनेस सेंटरचे रेमडेसिविर वाटपाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असतांना खासदार डॉ. हिना गावित यांनी तक्रार केल्यामुळे ते बंद पडले आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबातील गरीब रूग्णांना भोगावा लागत आहे. आज रुग्णांना गैरसोयचा सामना करावा लागत असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे.