
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा नेतृत्वात विकास गंगा, समृद्ध, संपन्न व सुरक्षित देश : खा. उन्मेश पाटील
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा नेतृत्वात विकास गंगा, समृद्ध, संपन्न व सुरक्षित देश : खा. उन्मेश पाटील
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार): पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात दुसर्या टर्मच्या सरकारच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे शिरपूर विधान सभा मतदार संघात खा. उन्मेश पाटील यांची व्हर्च्युअल सभा (व्हिडीओ कॉन्फरन्स मिटींग) दि. ५ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेला आयोजित करण्यात आली होती. या मिटिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा केलेल्या सर्वांगीण विकासा सोबत सीमा सुरक्षा, शेतकरी हितासाठी घेतलेले निर्णय, कलम ३७०/३५ एचे महत्व, ट्रिपल तलाक रद्द करून मुस्लिम महिलांना दिलेला न्याय अशा अनेक बाबी सहभागिं समोर खा. उन्मेश पाटील यांनी मांडल्यात. तसेच देशात सामान्य माणसाला न्याय देणाऱ्या अनेक योजनांची माहिती या बैठकीच्या माध्यमातून दिली. राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव व खरेदीची हमी दिली होती. खतांचा योग्य व नियोजनबद्ध पुरवठा केला असतांना वर्तमान सरकार यावर पूर्णतः अपयशी ठरली असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या व्हिडीओ बैठकीला राज्याचे शालेय शिक्षण माजी मंत्री अमरीशभाई पटेल, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, प्रमुख पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व आदि कार्यकर्त्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सभेची तांत्रिक बाजु धिरज देशमुख, मनिष पाटील यांनी सांभाळली.
शिरपूर तालुक्याचा चौफेर विकास
राज्यात सिंचन पॅटर्न आदर्श ठरला आहे.
शिवाय शिरपूर तालुक्याला खा. डाॅ हिनाताई गावित व पर्यटन विकास माजीमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनातून वेळोवेळी मिळालेल्या निधीतून शिरपूर तालुक्याचा रस्ते, पर्यटन क्षेत्रात तसेच समाज मंदीर आदि भरीव विकास झाला आहे. माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून स्व. मुकेशभाई पटेल यांच्या नावाने साकारलेले अत्याधूनिक गार्डन परिसरात सर्वांचे आकर्षण ठरले आहे. तालुक्यात लवकरच 300 बेडचे आत्याधूनिक हॉस्पिटल साकारले जात आहे. माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वामुळे वेगवेगळया शाखांचे शिक्षणाचे दालने उभी केल्याने शिरपूर शिक्षणाची पंढरी म्हणून देखील उत्तर महाराष्ट्रात परिचित आहे. बालाजी मंदिरामुळे आध्यात्मिक ओळख देखील शिरपूर शहराची असल्याने एक चौफेर विकास झालेला मतदार संघात सर्वच्या सर्व संस्था भाजपाच्या ताब्यात असल्याने शिरपूर आता भाजपाचा बालेकिल्ला झाला असलेल्याचे खा. उन्मेश पाटील यांनी यावेळी सांगितले.