
स्वर्गीय हरीभाऊ शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देणारे लोकप्रिय नेतृत्व : माजी मुख्यमंत्री फडणवीस
स्वर्गीय हरीभाऊ शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देणारे लोकप्रिय नेतृत्व : माजी मुख्यमंत्री फडणवीस
जळगाव जिल्ह्यात भालोद येथे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
यावल ( सुरेश पाटील ) : स्व.हरिभाऊ जावळे यांनी खासदार, आमदार असताना आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष असतांना सुद्धा नेहमी आपल्या मतदार संघातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सक्रिय भूमिका घेऊन ठोस निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे ते शेतकर्यांसह सर्व स्तरातील घटकांचे लोकप्रिय नेतृत्व होते. त्यामुळे हरिभाऊ आपल्यात नाहीत हे खरे वाटत नाही. त्यांच्या अचानक दुखद निर्णयामुळे भाजपची मोठी हानी झाल्याची तसेच भाजपात असे एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी होण्यास खूप वेळ लागतो.अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 8 2020 बुधवार रोजी रात्रि भालोद तालुका यावल जिल्हा जळगाव येथे स्व.हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांची उपस्थिती होती उपस्थित सर्वांनी हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांचे सांत्वन केले.