लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत…- राजेश टोपे

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क):  लस हे अमृत नाही. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणं अपेक्षित असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

आपल्या जीवाची पर्वा न करता सलग आठ महिन्यांपासून अधिक काळ रुग्णसेवेत झोकून देणार्‍या महाराष्ट्रातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संपादक- पत्रकारांचा सन्मान शुक्रवारी आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कोरोना झालेल्या रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण 93 टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 600 दिवसांपर्यंत गेले आहेत. कोरोनाला आटोक्यात आणण्याचे खरे श्रेय डॉक्टरी सेवा देणार्‍या कोरोना योद्ध्यांचे आहे. मानवतेचे रक्षण करण्याचे काम डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांमध्येच देवाचे दर्शन झाले आहे, असं राजेश टोपेंनी म्हटलंय.

कोरोना काळात अनेक हात पुढे आले. सेवा देण्याचे हेे काम मानवतेच्या दृष्टीने झाले आहे. कोरोनाकाळात काम करणाऱ्या पत्रकारांना विमा कवच मिळालेच पाहिजे यासाठी मीही आग्रही असून पत्रकारांसाठी सरकार दरबारी मी कायम वकिली करीत राहीन, अशी ग्वाही टोपे यांनी दिली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *