लाखों एकर भूमी लुटणार्‍या वक्फ बोर्डाचा ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’ पेक्षाही भयंकर

Featured जळगाव
Share This:

– हिंदूंनी या विरोधात लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि). वर्ष 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार ने वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करून मुसलमानांना अमर्याद अधिकार दिले. या सुधारित कायद्या मुळे कोणत्याही ट्रस्ट वा मंदिर यांची संपत्ती नव्हे, तर कोणतीही संपत्ती वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचा पाशवी अधिकार बोर्डाला मिळाला. त्या मुळे आज भारत शासनाच्या संरक्षण दल आणि रेल्वे विभाग यांच्या नंतर सर्वाधिक (6 लाख एकर) भूमीचा मालक वक्फ बोर्ड आहे. मुळात वक्फ कडे इतकी भूमी कधीच नव्हती; मात्र हिंदूंचे या कायद्या विषयी असलेले अज्ञान तथा उदासीनता या मुळे वक्फ बोर्डा कडून देशभरात लाखो एकर भूमी लुटण्याचा अक्षरश: नंगा नाच चालू आहे. बोर्डाचा चालू असलेला ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’ पेक्षाही भयंकर आहे. त्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन कायदेशीर लढा द्यायला हवा, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे अध्यक्ष हरि शंकर जैन यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्येबोलत होते. हे अधिवेशन समितीच्या ‘यू-ट्यूब’ चॅनल आणि ‘फेसबूक पेज’द्वारे ४२६०० हून अधिक जणांनी लोकांनी प्रत्यक्ष पाहिले, तर 1 लाख 60 हजारांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘आपले प्राचीन भारतीय शिक्षण, न्याय व्यवस्था, राज्य व्यवस्था, वैद्यक शास्त्र, वास्तू शास्त्र आदी प्रगत आणि विश्‍वात सर्वोष्कृष्ट आहे. लॉर्ड मेकॉलेनंतर मात्र कम्युनिस्ट विचारांनी ग्रस्त पंडित नेहरूंनी शैक्षणिक धोरणे ठरवण्याचे अधिकार कम्युनिस्टांकडे दिले; परिणामी गेल्या एक हजार वर्षांत मोगल आणि इंग्रज यांनी जेवढी भारताची हानी केली नसेल, तेवढी हानी डाव्या विचार धारेच्या लोकांनी 70 वर्षांत केली आहे. आता डाव्या विचारांच्या टोळ्या भारताचे तुकडे करण्यासाठी सरसावल्या आहेत. या विरोधात हिंदूंनी सत्य इतिहास अन् संस्कृती जाणून घेऊन लढण्यास सज्ज झाले पाहिजे.’

रायपूर, छत्तीसगड येथील नवम् पीठाधीश पू. शदाणी दरबार तीर्थचे पू. युधिष्ठीरलालजी महाराज म्हणाले की, आज विश्‍वभरातील हिंदूंनी आपल्या अंतर्मनातील हिंदु राष्ट्रस्थापनेचा विचार व्यक्त करायला हवा. जेणेकरून सर्वत्रचे हिंदु जागृत होतील आणि राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवाज उठवतील. आपण जेवढ्या लवकर संघटित होऊ,तेवढ्या लवकर हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण होईल. यावेळी ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या समन्वयक अश्‍विनी कुलकर्णी यांनी ‘अन्नधान्य,दूध, पेट्रोल-डिझेल यांतीलभेसळ; वजन-मापात फसवणूक; शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार; ग्राहक आणि रुग्ण यांची लुटमार आदींनाकारणीभूत सामाजिक दृष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा द्यायला हवा. ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत यांविरोधात आवाज उठवणे, तक्रारीकरणे, न्यायालयात जनहित याचिकाकरणे आदी माध्यमांतून ‘आरोग्यसाहाय्य समिती’ कार्यरत असून यात राष्ट्रप्रेमी जनतेनेही सहभागी व्हावे’, असे आवाहन केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *