
धरणगाव ते छत्तीसगड 21 मजुरांना घेऊन लालपरी बस रवाना
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सूचने नुसार अडकलेल्या मजुरांना दिलासा
धरणगाव – धरणगांव येथून 21 मजुरांना घेऊन एस टी बस धरणगाव बस बसस्थानकावरून धरणगाव ते छत्तीसगड सकाळी 8:30 वाजता पाठविण्यात आली प्रत्येक सीटवर एक प्रवासी अशी काळजी घेवुन व बस सॅनीटायझर व फवारणी करून स्वच्छ करून पाठविण्यात आली जवळ जवळ 1400 कि.मी अंतर असून MH 20 बी एल बस क्रमांक 3402 बस ड्रायव्हर आनंदा पाटील,के एस सोनवणे दोन ड्रायव्हर सोबत पाठविण्यात आले
या प्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर, टी आय गोविंदा बागुल,वाहतूक नियंत्रक प्रल्हाद चौधरी,जितु सोनवणे, मुकुंदा पाटील,नगरसेवक गुलाबराव मराठे,संभाजी कंखरे,पत्रकार धर्मराज मोरे, जितू लोहार,बाळासाहेब पाटील, प्रदीप कुंभार,विकास पाटील आदी मान्यवरांनी प्रवाशांना आपला प्रवास सुखाचा होण्या संदर्भात काळजी घेण्या संदर्भात सूचना करून शुभेच्छा दिल्यात.