धुळे : लळिंग धबधब्यात बुडुन तरुणाचा मृत्यु

Featured धुळे
Share This:

धुळे, (ललित चव्हाण) . धुळे जवळील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस. एस. व्ही. पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन च्या सुमारास घडली. मरण पावलेल्या तीन पैकी दोन जण धुळे शहरातील तर अमळनेर येथील रहिवासी आहे. इतर तीन जणांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी एकाचे नाव रोहित गिरासे,असे आहे.  तो धुळे शहरातील जी टी पी कॉलनी देवपूर येथील रहिवासी आहे.  घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. जखमी विध्यार्थी विमनस्क अवस्थेत असून ते काहीही बोलत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची नावे स्पष्ट होण्यास उशीर होईल, असे पोलिस निरीक्षकानी सांगितले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *