जळगाव: कृती फाऊंडेशन”च्या वतीने रेडक्रॉस कम्युनिटी किचनला सात क्विंटल धान्याची मदत 

Featured जळगाव
Share This:
जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ) : कोणतीही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती मानवी भाव भावनांची राखरांगोळी करते. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण जग  हतबल झालंय.समाजातील प्रत्येक घटक  कोरोनाविरूध्दच्या लढाईत आपापल्यापरीने सामिल झाला आहे. “कृती फाऊंडेशन”देखिल कोरोना विरूध्दच्या लढाईत ठामपणे सामिल झालयं. रेडक्राँसने गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेल्या कम्युनिटी किचनला “कृती”च्या कार्यकर्त्यांनी नुकतीच भेट देऊन रेडक्राँसच्या या उपक्रमाची प्रसंशा केली.
कम्युनिटी किचन या उपक्रमाला “कृती”च्यावतीने सात क्विंटल धान्याची मदत करण्यात आली.त्यात  300किलो गहू,200 किलो तांदूळ, तूरडाळ व गोडेतेल यांचा समावेश होता.फौंडेशनच्या वतीने   सचिव श्री.जी.टी.महाजन फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रशांत महाजन,कार्याध्यक्ष अमित माळी,डॉ.श्रध्दा माळी,सुजित माळी, निखिल ठक्कर यांनी सदरचे साहित्य कम्युनिटी किचनचे व्यवस्थापन करणारे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख श्री. सुभाष सांखला,संस्थेचे सचिव श्री. विनोद बियाणी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख श्री. सोपान गणेशकर,जनसंपर्क अधिकारी श्रीमती उज्वला वर्मा यांना सुपूर्द  केले.या ऊपक्रमाला अनिल  मोहिले,वासंती पाटील,उषा रामदास माधुरी  भावसार यांचे आर्थिक योगदान लाभले .
“कृती फाऊंडेशन”ने यापूर्वी देखिल रेडक्राँसच्या मानवतावादी उपक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. थँलेसेमिया बालकांना त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी खर्चात तात्काळ कळावी म्हणून जर्मन बनावटीचे अद्यावत “कोम्बो लँब”अँनालायझरचे समर्पण करण्यात आले होते. याशिवाय रेडक्राँसच्या जीवनदायी योजनेत सहभागी होऊन गरजू रूग्णांना नि:शुल्क रक्त पिशवी  उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. थँलेसेमियाग्रस्त बालकांना रेडक्राँस तर्फे विनामूल्य रक्त पिशवी दिली जाते. त्यासाठी “कृती फाऊंडेशन”वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत असते.”कृती”चे कार्यकर्ते मागणीनुसार प्लेटलेट्स् दान करण्यासाठी सदैव तत्पर असतात.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *