कोविड रुग्णांचे दात दुखत आहे ? – सावधान

Featured इतर
Share This:

कोविड रुग्णांचे दात दुखत आहे ? – सावधान

म्युकॅारमायकोसिस म्हणजे काय?
म्युकॅारमायकोसिस दुर्मिळ असला तरी नवा नाही प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजे म्युकॅारमायकोसिस होणे तसेच त्यामुळे मृत्यू होणे अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत पण covid-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे कविड-१९ मधून चांगल्या पद्धतीने बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेग वाढणे ही काळजीची बाब आहे या विकाराला झायगोमायकोसिस म्हणूनही ओळखले जाते सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल & प्रेवेंशन अर्थात सीडीसी च्या म्हणण्यानुसार हा बुरशीजन्य संसर्ग दुर्मिळ आहे.गेल्या 15 दिवसांत आमच्या सेंटर येथे कोविड-19मुळे झालेल्या म्युकॉर्मायकॉसिसच्या ८ ते १० केसेस आढळल्या आहेत.

म्युकॅारमायकोसिस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिक रित्या अस्तित्वात असते मात्र जेव्हा मानव शरीराची प्रतिकारक शक्ती क्षीण झालेली असते, तेव्हा तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनस यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. खुल्या जखमां मधूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करू शकते.
म्युकॅारमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही म्हणजे एकापासून दुसऱ्याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही असेही सीडीसी ने स्पष्ट केलेले आहे. लवकर व योग्य निदान आणि योग्य बुरशी प्रतिकारक उपचार पध्दती हे पेशंट लवकर बरे होण्यासाठी आवश्यक आहे.

म्युकॅारमायकोसिसचा धोका कोणाला ?

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना म्हणजे एकंदरीत ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना म्युकर मयकॉसिसचा जास्त धोका आहे.

म्युकॅारमायकोसिसची लक्षणे कोणती?

तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पस येणे, दात हलने, जबड्याचे हाड उघडे पडणे,डोके दुखणे, सायनस रक्त संचय, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यांच्या वर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.

Covid-19 आणि म्युकॅारमायकोसिस

म्युकॅारमायकोसिस हा आजार मधुमेह असणारे रुग्ण, जे रुग्ण steroids वर आहे अशा रुग्णांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी असते. Covid-19 उपचार घेत असलेल्या रुग्णांना steroids आणि आणखी काही औषधे देण्यात येतात जेणेकरून त्यांचा आजार बरा होईल पण यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वर वाईट परिणाम होतो या सगळ्यांमुळे म्युकॅारमायकोसिसचा धोका वाढतो

म्युकॅारमायकोसिस चे निदान कशे करायचे?

सिटीस्कॅन, इंडॉस्कॉपी व बायोप्सी च्या साह्याने आपण लवकर म्युकॅारमायकोसिसचे निदान करू शकतो त्यामुळे वरील लक्षणे आढळल्यास त्वरित आपण दंत व मुख्य आरोग्य विशेष तज्ञ सल्ला घेणे आवश्यक आहे.

म्युकॅारमायकोसिस वर उपचार काय?

तातडीने निदान करून बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती अवलंब करणे आवश्यक आहे (Antifungal therapy).
पण संसर्ग शरीराच्या इतर अवयावा पर्यंत पोहोचला असल्यास शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते.

उपचार करण्यास विलंब झाल्यास होणारी गुंतागुंत
या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकते, तसंच नाक आणि जबड्याच्या हाडावर दुष्परिणाम होतो आणि पंधरा दिवसात या संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास पेशंटच्या मृत्यूची शक्यता 50% असते असं सीडीसी च्या म्हणण्यानुसार आपल्याला कळलं आहे.

त्यामुळे कोविड मधुन बरे झालेल्या रुग्णांनी आणि खास करून सोबत मधुमेह आणि इतर आजार असलेल्या रुग्णांनी एकदा मुख आरोग्य तपासणी न चुकता करून घ्यावी कारण पुढे निस्तारण्यापेक्षा वेळेवर काळजी घेतलेली बरी.
Covid – १९ चे उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स ला माझी कळकळीची विनंती आहे की सर्व बरे झालेले आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना मुख आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला द्यावा आणि मी सर्व दंत चिकित्सक विनंती करतो की दातासंबंधी तक्रार घेऊन येणाऱ्या अश्या रुग्णांची योग्य प्रकारे तपासणी करून त्यांना योग्य सल्ला द्यावा.
डॉ घन:श्याम पाटील निलेश डेंटल केअर नंदुरबार

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *