
यावल: कोळन्हावी येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात पारडू ठार
डांभुर्णी ता.यावल (तेज समाचार प्रतिनिधि ) : येथून जवळ आसलेल्या न्हावी प्र.अडावद (कोळन्हावी) येथे काल दि. २२रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारात अशोक दगडू सोळंके यांच्या शेत गट न.११७ या शेतात देवानःद सोळंके यांच्या मालकीचे वगारु पारडे हे अर्धेवट खाल्लेल्या अवस्थेत आढळुन आल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पारडूवर हिंस्र प्राण्याने हल्ला करुन त्याला खाल्ले असल्याचे घटनास्थळी निदर्शनास आल्याने डांभूर्णी येथील पशुवैद्यकिय आधीकारी मनोज पाटील यांनी घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन केलै.तसेच वनक्षेत्रपाल विषाल कुटे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल एस आय पिंजारी,आर एस निकुंभे,एस टी पंडीत,एफ डी शिवदे याःनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पूढील तपास शिवदे हे करीत आहेत.या घटनेमुळे परीसरातील लोकांनी एकटे शेतपरीसरात न फिरता दोन तीन लोकांनी अंतर ठेवुन वावरावे असे आव्हाहन करण्यात आले आहे.