
धुळे : तरुणावर चाकू ने सपासप वार करून लुटली हजारोंची रोकड
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). देशात लॉक डाऊनची परिस्थिती आहे. लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे. शहरात चौका, चौकात, महामार्गावर महत्वाचा ठिकाणी पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असतांना हि चोरटे मात्र संधीचे सोने करताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यातील तरूणाला मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी मारहाण करुन 15 हजार रोख रक्कम, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड असे अज्ञात तीन चोरट्यांनी लुटून घटना स्थळाहून पसार झाले.
याबाबत माहिती की, प्रशांत देविदास पाटील.(22) रा.मोंढाळे येथील तरुण खाजगी नोकरी निमित्ताने नाशिकात होता.आईला भेटण्यासाठी नाशकातून मोंढाळाल्या जाण्या करता आयशर गाडीतून प्रवास करत असताना झोपला.त्याला पारोळा चोफुली जवळ उतरायचे होते.तो तिथे उतरू शकला नाही.मुंबई आग्रा महामार्गावरील देवपूरातील नांदेडकर गॅरेज जवळ मध्यरात्री उतरला यावेळी त्याने त्याचे पाहुणे राहुल राजेंद्र देसले यांना फोन केला व सांगितले की मी नांदेडकर गॅरेज जवळ उतरलो आहे. त्यांनी त्याला सांगितले की मी क्रूझर गाडी घेऊन तुला घ्यायला येतो. याच दरम्यान प्रशांत पाटील पायी चालत पुढे जाऊ लागला पाठीमागून दुचाकीवर अज्ञात तीन जणांनी त्याचा मोटरसायकल वर पाठलाग करून त्याच्याजवळ पैशाची मागणी केली. त्याने पैसे दिले नाही.याकरता त्याला मारहाण केली व त्याच्या जवळील पॅन्ट मधील खिशातून 15,000 रोख हिसकावून घेत,पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड असे लुटून चोरट्यांनी त्याला चाकूने पाठीवर वार करत जखमी करून तेथून धूम स्टाईलने चोरटे पसार झाले.
रक्तबंबाळ स्थितीत नागरीकांनी तातडीने तरुणाला चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज,रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. प्रशांत पाटील जखमी तरूणाने दिलेल्या लेखी तक्रारीनुसार देवपूर पोलिसांनी अज्ञात तीन मोटरसायकल चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास देवपूर पोलिस करत आहे.