
केरळ : माणूस झाला सैनात, बिबट्याला शिजवून खाल्लं!!!
केरळ (तेज समाचार डेस्क). माणूस ही आता किती हिंस्र बनत चालला आहे हे केरळमध्ये घडलेल्या प्रकारावरून लक्षात येईल. समाजकंटकांनी 50किलोच्या बिबट्याला ठार करत त्याचं मांस शिजवून खाल्लं आहे. केरळमधील इडुकी गावात हा प्रकरा घडला आहे. घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात जंगलातून बाहेर आलेला बिबट्या अडकला या बहाद्दरांनी वन विभागाला माहिती न देता जंगी पार्टीचा बेत आखला.

विनोद, कुरिकोस, बीनू, कुंजप्पन आणि विन्सेट अशी या आरोपींची नावं आहेत. यामधील विनोदच्या शेतामधील जाळ्यात बिबट्या अडकला होता. त्यानंतर त्याने या सर्वांना बोलावून बिबट्याला ठार मारलं आणि त्याचं मांस शिजवून खाल्लं. दरम्यान, विनोदच्या घरातून 10 किलो मांस आणि बिबट्याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केलं आहे. बिबट्याची नखं, दात आणि कातडं विकण्याची या सर्व आरोपींची योजना होती.