दुचाकीवरून विद्यार्थिनीचे अपहरण, दोघांचा अत्याचार

Featured महाराष्ट्र
Share This:

नागपूर (तेज समाचार डेस्क):  उपराजधानीत खून, हत्त्या,बलात्कार आणि अपहरणांच्या घटना (nagpur crime) सुरूच आहेत. त्यात आणखी भर पडली असून दोन युवकांनी सतरा वर्षीय मुलीचे दुचाकीवरून अपहरण केले. तिला मारहाण करून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) अपलोड केले. दोन्ही आरोपींनी बलात्कार केल्याची तक्रार मुलीने केली आहे. आरोपी मुलीला ठार मारणार होते. पण नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावली. पोलिसांनी (nagpur police) समीर सलीम खान आणि मोहम्मद सादिक मोहम्मद सिद्दीकी शाह या आरोपींना अटक केली आहे. (girl student kidnapped in nagpur)

दोन वर्षांपूर्वी पीडित विद्यार्थिनी रियाची एका मैत्रिणीच्या माध्यमातून समीर खान सलीम खान (वय १९ रा. बंगाली पंजा) याच्यासोबत ओळख झाली. समीरने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघेही टिकटॉवर व्हिडिओ अपलोड करायला लागले. एक वर्षापूर्वी समीर याने रियाला(बदललेले नाव) लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर कन्हान कांद्री परिसरातील लॉजमध्येही त्याने तिचे शारीरिक शोषण केले. दरम्यान, समीरला रियाच्या मोबाईलमध्ये तरुणांचे मोबाईल क्रमांक दिसले. तसेच वाढदिवसाच्या पार्टीत ती एका तरुणासोबत बोलली. रियाचे अन्य युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय समीरला आला. त्याने मोहम्मद सादिक मोहम्मद सिद्दीकी शाह (वय २५ रा. एनआयटी क्वॉर्टर, संजीवन कॉलनी) याच्या मदतीने तिचे अपहरण केले. तिला मारहाण करताना मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले. त्या व्हिडिओवरून पीडित मुलीचा पोलिसांनी शोध घेतला. दोन्ही आरोपींनी रियाला विटाभट्टी चौकात नेऊन तो तिला ठार मारणार होता. परंतु, रिया बचावली. दरम्यान, या चित्रीकरणाची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना मिळाली. गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनच्या पथकाने समीर व त्याच्या साथीदाराला अटक केली. याप्रकरणी दोन युवकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली. मो. सादिक शाह हा प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतो.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *