खामगाव: जगप्रसिद्धलोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी !
खामगाव: जगप्रसिद्धलोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी !
खामगाव ( मोहम्मद फारुक) : जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवराचे पाणी लालसर झाले असल्याचे निदर्शनात येत आहे मात्र याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे लोणार सरोवर अभ्यासकांमध्ये याबाबत मतभिन्नता असल्याचे समोर येत आहे पाणी लालसर झाल्यामुळे परिसरात हा विषय चर्चेचा ठरला आहे महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणून ही लोणार सरोवर ची ओळख आहे ग्लोबल वार्मिंग आणि पावसाच्या अनियमितते मुळे येथील पर्यावरणात बरेच बदल झाल्याची चर्चा सातत्याने असते त्यात आता हे पाणी लाल झाल्यामुळे अधिक भर पडत आहे लोणार येथे अभ्यासासाठी येणाऱ्या परदेशातील तथा देशातील शास्त्रज्ञांना सहकार्य करण्यासोबतच त्यांना येथील सविस्तर माहिती देण्याचे काम करणारे वैज्ञानिक मार्गदर्शक आनंद मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार वातावरणातील बदल , वातावरणात निर्माण झालेला कोरडेपणा , सरोवर परिसरातील कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे सरोवराचे पाणी कमी झाले आहे अशा बदलातून हा प्रकार झाला असावा असे मत त्यांनी व्यक्त केले दरम्यान लोणार येथीलच प्रा डॉ सुरेश मापारी यांनी काही जल तज्ञांशी याबाबत चर्चाही केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हॅलोबेक्टेरिया आणि सलीना नावांच्या कवकाची (बुरशी) खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे कॅरोटेनाईड नावाच्या रंग युक्त पदार्थ स्त्रवतो त्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला असावा असे तज्ञ सांगत आहे मात्र आताच या वाढीची क्रिया तेवढ्या मोठ्या प्रमाणात का हा प्रश्न अनुत्तरित आहे असे त्यांचे म्हणणे
बॅक्टेरिया वाढल्यामुळे एका रात्रीच असा बदल होऊ शकत नाही त्यामुळे याचे नेमके कारण शोधणे गरजेचे झालेले आहे तीन अभ्यासकांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्या मतांमध्ये भिन्नता आढळून आली
जगात चमत्कारांचे दोन प्रकारआहेत, एक मानव निर्मित चमत्कार तर दुसरा नैसर्गिक चमत्कार. त्यातील लोणार सरोवर हे नैसर्गिक चमत्कारामध्ये मोडते. निसर्गहाही चमत्कार घडविणारा अवलियाच आहे.
लोणार सरोवर हे देखील निसर्गाने घडविलेला चमत्कारच म्हणावा लागेल आणि हा चमत्कार महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे झालाआहे लोणार हे जगातल सर्वात मोठं अंडाकृती सरोवर आहे. उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे.
लोणार संवर्धनासाठी उच्च न्यायालयाच्या सहकार्यासाठी बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक समितीची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने या सरोवराचे पाण्याचे नमुने मायक्रो बायलॉजिकल इन्स्टिट्यूट पुणे येथे पाठवण्याची व्यवस्था लवकरच या प्रदूषणावर नियंत्रण करू शकतो शकणार आहे याकरिता माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्वांच्या पाण्याची पाण्याचे नमुने पाठवण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांनी विनंती केली आहे
जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाले… लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रुप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झाले.
दरम्यान आज 10 जून रोजी तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचे संशोधन सुरू आहे. आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काही जिज्ञासूंनी विचार करायला सुरुवात केली आहे.