करवंद उपसरपंचपदी : सौ. सोनाली कुवर (धोबी)समाजातील कार्यकर्त्यांनी सामाजिक व राजकिय श्रेत्रात अग्रेसर असावे : एकनाथराव बोरसे   

धुळे
Share This:

करवंद उपसरपंचपदी : सौ. सोनाली कुवर (धोबी)समाजातील कार्यकर्त्यांनी सामाजिक व राजकिय श्रेत्रात अग्रेसर असावे : एकनाथराव बोरसे

 शिरपूर (मनोज भावसार): तालुक्यातील करवंद गावाच्या रिक्त उपसरपंच निवड (दि.१४आॅक्टो) रोजी बिनविरोध करण्यात आली माजीमंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा यांचा मार्गदर्शानाखाली धुळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवेंद्र पाटील यांचा पुढाकाराने उपसरपंच निवड बिनविरोध झाली असुन करवंद येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर हिलाल कुवर यांच्या धर्मपत्नी सौ. सोनाली किशोर कुवर (धोबी) यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ग्रामविकास अधिकार ए. एन. पाटील यांनी काम पाहिले. निवड प्रसंगी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे म्हणाले कि समाजातील होत करु कार्यकर्त्यांनी व महिलांनी सामाजिक, राजकिय तसेच इतर श्रेत्रात अग्रेसर राहुन समाज सेवा, जनसेवा सोबतच देश सेवा करुन आपल्या परिवारा सोबतच समाजाचे हि नाव लौकीक करावे असे आवाहान केले. उपसरपंच सौ. सोनाली कुवर यांची निवड प्रसंगी सत्कार समारंभ वेळी ते बोलत होते. यावेळी उघोगपती तथा नगरसेवक कै. तपनभाई पटेल, ग्रा. पं. सदस्या कै अस्तोलबाई पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपसरपंच निवड प्रसंगी धुळे जिप माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवेंद्र पाटील, करवंदच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मनिषा पाटील, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, माजी उपसरपंच भास्कर अहिले, साहेबकोरबाई राऊळ, प्रेमसिंग राऊळ, सामाजिक कार्यकर्ते आनंदसिंग राऊळ, भाईदास पाटील, धनराज पाटील, तेजेंद्रसिंग राऊळ, कृष्णा वाणी, लक्ष्मण शिंपी, पी. एस. महाले तलाठी, महेश वाणी, शिवदास गांगुर्डे, दिलीप राऊळ, अनिल कुवर, धर्मराज खैरनार सेवानित्तवृ असई, जितेंद्र बोरसे, उमेश खैरनार, ईश्वर येशी, प्रविण येशी आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *