करिश्माने आठवण काढली ‘कुली नंबर वन’च्या गाण्याची

Featured महाराष्ट्र
Share This:

 

मुंबई (तेज समाचार डेस्क): डेव्हीड धवनने (David Dhawan) 1995 मध्ये गोविंदा (Govinda) आणि करिश्मा कपूरला (Karisma Kapoor) घेऊन कुली नंबर वन प्रेक्षकांसमोर आणला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान चालला होता. यातील गाणीही प्रेक्षकांच्या तोंडात बसली होती. आता 25 वर्षानंतर डेव्हीड धवन पुन्हा एकदा कुली नंबर वनची रिमेक प्रेक्षकांसमोर घेऊन येत असून यात नायक म्हणून मुलगा वरुण धवन (Varun Dhawan) आणि नायिका म्हणून सैफ अली-अमृता सिंहची मुलगी सारा अली खानला (Sara Ali Khan) घेतले आहे. या सिनेमाचे हुस्न है सुहाना गाणे तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. या गाण्याची तुलना गोविंदा आणि करिश्माच्या गाण्याबरोबर केली जात आहे. त्यातच करिश्मानेही तिच्या या गाण्याची आठवण गाण्यातील एक फोटो टाकून सोशल मीडियावर ताजी केली आहे.

करिश्मा नेहमीच सोशल मीडियावर तिच्या जुन्या चित्रपटातील फोटो टाकून त्याच्या आठवणी ताज्या करीत असते. करिश्माने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत करिश्मा आणि गोविंदा नाचताना दिसत आहे. करिश्माचे गोविंदासोबतचे हे पहिलेच गाणे होते. करिश्माने लिहिले आहे ‘हुस्न है सुहाना चीचीसोबत माझे पहिले गाणे होते. डांसचा आमचा प्रवास खूपच चांगला झाला होता. हा सिनेमा चीची (बॉलिवुडमध्ये गोविंदाला चीची म्हणतात) आणि दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत खूप आठवणी आहेत. करिश्माच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना वरुण धवनने ‘लव यू लोलो.’ असे म्हटले आहे. करिश्माला सगळे प्रेमाने लोलो म्हणतात. रणवीर सिंहनेही करिश्माच्या ट्विटवर कमेंट केली आहे.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *