
ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगणाचं संजय राऊतांवर टीकास्त्र; म्हणाली…
मुंबई (तेज समाचार डेस्क): काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगणा राणावत यांच्यात जुंपली होती. यानंतर आता कंगणानं दसऱ्यानिमित्त तिच्या मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो ट्विट करत राऊतांवर पुन्हा टीकास्त्र सोडलंय.कंगणा राणावतने ट्विटरवर हनुमानाच्या मूर्तीचा आणि मुंबईतल्या कार्यालयाचा फोटो शेअर केला आहे. तसेच माझी तुटलेली स्वप्नं तुमच्या चेहऱ्यासमोर हसत आहेत संजय राऊत, असं कंगणा राणावत म्हणाली आहे.
पप्पू सेना माझं घर तोडू शकते. पण माझ्या आत्म्यावर घाला घालू शकत नाही, असं कंगणाने म्हटलं आहे. बंगला क्रमांक 5 आज सत्याचा असत्यावर विजय साजरा करत आहे, असं कंगणाने म्हटलंय.
दरम्यान, कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयावर महापालिकेनं कारवाई केल्यावर कंगणानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका सुरू केली.